आरएन क्रिकेट अकादमी पंढरपूरच्या मुलींची हिंगोली जिल्हा संघाकडून निवड
सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींच्या आंतरजिल्हा आमंत्रित एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेसाठी हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मुलींचा संघ काल जाहीर करण्यात आला आहे.

या महिन्यात (सप्टेंबर) स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींची निवड महाराष्ट्राच्या संघात होणार आहे.पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावातील प्रचिती पाटील हिच्याकडे हिंगीली संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.या संघाला मार्गदर्शन आरएन क्रिकेट कलबचे रवी निंबाळकर सर करत आहेत. या सर्व मुली ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.
हिंगोली जिल्हयाच्या मुलींचा संघ पुढीलप्रमाणे आहे – प्रचिती पाटील (कर्णधार), आनंदी पाटील ,अहिल्या घोडके,सई रोंगे, सौम्याश्री बारंगुळे,आर्या शिरसट,सृष्टी चट्टे, प्रांजली गलांडे, रोहिणी चव्हाण,तनया फुले, इशिता फर्नांडीस, श्रेया आमले, सिद्धी देवले – पाटील ,वैष्णवी कल्याणकर.