रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान
स्वराज्यभूमी प्रतिष्ठान,जय हनुमान तरुण मंडळ करंजे व अक्षय रक्तपेढी हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने करंजे येथे रक्तदान शिबीर

करंजे/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०९/२०२५ – स्वराज्यभूमी प्रतिष्ठान आणि जय हनुमान तरुण मंडळ, करंजे व अक्षय रक्तपेढी हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन करंजे येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रविवार दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन करंजी येथे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
या पार पडलेल्या रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत एकूण १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.याप्रसंगी जय हनुमान तरुण मंडळ व ग्रामस्थ करंजे , स्वराज्यभूमी प्रतिष्ठाणचे शिवपाईक तसेच तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

गडकिल्ले,समाधी,विरघळ संवर्धन याबरोबर शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य या सर्वच क्षेत्रात स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण उल्लेखनीय कामगिरी करत आहे. आजवर स्वराज्यभूमी प्रतिष्ठाणने ४०७ पेक्षा जास्त गरजूंना मोफत रक्त उपलब्ध करून दिले आहे तर १४९६ बॅगांचे रक्तसंकलन केले आहे.
ग्रामस्थ मंडळ करंजे यांच्यावतीने अक्षय रक्तपेढी व स्वराज्यभूमी प्रतिष्ठाणचे आभार मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
