भाळवणीतील हायस्कूल मध्ये क्रीडा दिन साजरा
भाळवणी / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य एस.डी. रोकडे,पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र लाले,प्रमुख पाहुणे सरपंच रणजीत जाधव व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माळवदे आदी उपस्थित होते.
डॉ पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी क्रीडाशिक्षक गजानन जगदाळे यांचा सत्कार सरपंच रणजीत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.क्रीडा विभागाकडून जिल्हास्तरीय निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्व शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेळाडू मधील अमृता सराटे पाटील व शिवांजली देशमुख यांनी केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड विश्वजीत जाधव यांनी जाहीर केली याला अनुमोदन ओंकार कुंभार यांनी दिले.
कोमल नवाडे व अमृता देवकते या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.शिक्षक रणजीत दडस यांनी क्रीडा दिनाविषयी मनोगत व्यक्त केले. आभार तेजस्विनी बंडगर या विद्यार्थिनी मानले.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांचे व खेळाडूंचे सहकार्य लाभले.