भारतीय पॅरा ॲथलीट प्रीती पालने महिलांच्या 200 मीटरमध्ये कांस्यपदक पटकावले


preeti pal

भारतीय पॅरा ॲथलीट प्रीती पालने चमकदार कामगिरी करत महिलांच्या 200 मीटर T35 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. प्रीतीने अंतिम फेरीत आपली सर्वोत्तम कामगिरी करत 30.01 सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि पोडियम स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली. पॅरिस पॅरालिम्पिकमधील प्रितीचे हे दुसरे पदक आहे.

यापूर्वी तिने महिलांच्या 100 मीटर T35 प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. 23 वर्षीय प्रीतीचे कांस्यपदक हे पॅरिसमधील पॅरा ॲथलेटिक्समधील भारताचे दुसरे पदक आहे. याआधी प्रीतीने 100 मीटर स्पर्धेतही पदक जिंकले होते. 

महिलांच्या T35 प्रकारात 100 मीटर प्रकारात 14.21 सेकंदासह कांस्यपदक जिंकले. उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर येथील कन्या प्रीतीने पॅरालिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या ॲथलीटमध्ये पदकाचे खाते उघडले होते आता तिने पुन्हा कांस्य पदक जिंकले.  

Edited by – Priya Dixit  

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top