माॅडर्न पेंटॅथलाॅन स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूलमधील विद्यार्थ्यांचा विजय
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मार्कंडेय जलतरंग तलाव, सोलापूर येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत एमआयटी गुरुकुल स्कूलचा विजय झाला.
खेळातील विद्यार्थ्यांची नावे : १७ वर्षाखालील मुले – ओम अविनाश पाटील प्रथम क्रमांक, सुजल सुखदेव कदम द्वितीय क्रमांक.
१७ वर्षाखालील मुली – संस्कृती प्रमोद कटारिया प्रथम क्रमांक,आलिया मोलासी द्वितीय क्रमांक
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची पुणे येथील विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शाळेचे क्रीडा शिक्षक भूषण तायडे, पल्लवी पाटील आणि कविता कटारिया यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. शाळेचे प्राचार्य शिवाजी गवळी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.