प्रा.भगवान वाजे अलिबागकर यांना पीएच.डी.पदवी प्रदान
कोल्हापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21 ऑगस्ट 2024 – प्रा.भगवान नारायण वाजे अलिबागकर यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथुन शिक्षणशास्त्र विषयात संशोधनाचे कार्य पूर्ण केल्याबद्दल विद्यापीठाकडून त्यांना पी.एचडी.पदवी प्रदान करण्यात आली.
विज्ञान शिक्षकांच्या आकलन विकसनासाठी ज्ञान संच निर्मिती या विषयावर त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले असून या संशोधन कार्यासाठी त्यांना शिक्षणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील डॉ. कृष्णा पाटील व डॉ.निलिमा सप्रे यांचे मार्गदर्शन मिळाले.तसेच विभाग प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे,डॉ.एम.एस.पद्मिनी,डॉ. पी.एस.पाटणकर, डॉ.जी.एस.पाटील,डॉ. विद्यानंद खंडागळे, डॉ.रूपाली संकपाळ यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
डॉ.भगवान वाजे अलिबागकर हे ह.भ.प. श्री नारायण दादा अलिबागकर महाराज यांचे कनिष्ठ चिरंजीव असून ते सध्या रयत शिक्षण संस्थेच्या विठ्ठलराव देशमुख अध्यापक विद्यालय, माहूली जि.सांगली येथे कार्यरत आहेत.त्यांच्या यशाबद्दल समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना,वारकरी संप्रदाय पाईक संघासह श्री क्षेत्र पंढरपुरातील फडकरी,मठ प्रमुख,महाराज मंडळी,महाराष्ट्र -कोकणवासीय वारकरी व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मित्र मंडळ यांचेकडून अभिनंदन केले जात आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य व प्राध्यापक यांनी डॉ. वाजे यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.