स्वातंत्र दिनी निशिगंधा बँकेच्यावतीने देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम

स्वातंत्र दिनानिमित्त निशिगंधा बँकेच्या वतीने देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०८/२०२४:- १५ ऑगस्ट भारताचा ७८ वा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त येथील निशिगंधा बँकेतर्फे देशभक्ती पर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात लकी कराओके चे रफिक शेख व त्यांचे सहकलाकारांनी आपल्या भारदस्त आवाजात देशभक्ती पर गाणी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

सुरुवतीस उद्योजक व सुप्रभात मंडळाचे अध्यक्ष धनाजी देशमुख यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन आर बी जाधव होते.

स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन माजी सैनिक उत्तम कदम यांचा बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास कल्याणराव काळे,व्हा. चेअरमन् सतीश लाड, संचालक बी.बी. सावंत,महेश पटवर्धन,अनिल निकते,ॲड. क्रांती कदम, डॉ.एम.आर.टकले, डॉ.राजेंद्र जाधव,देवानंद गुंड-पाटील,सुनिल पाटील, अर्जुन जाधव,नारायण शिंदे, उध्दव बागल, यशवंतराव चव्हाण ना.सह. पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे,महादेव देठे, ॲड. रविकिरण कदम,अगस्ती देठे,ॲड.राजेश भादुले,भारत गदगे,सिराळ सर,विवेक कवडे, बंडू पवार,विकास पवार, राजेंद्र नरसाळे, प्रशांत फराटे तसेच बँकेचे सभासद,ठेवीदार व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बँकेचे सरव्यवस्थापक कैलास शिर्के व कर्मचारी वर्गाने प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top