मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सोलापुरात जंगी स्वागत

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सोलापुरात जंगी स्वागत

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०८/२०२४ – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे काल सायंकाळी सात वाजता सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांचे स्वागत दिलीप धोत्रे यांनी केले.

राज ठाकरे यांचे सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर जिल्ह्याच्या बॉर्डर वरती भीमानगर पासून टेंभुर्णी माढा मोडनिंब मोहोळ लांबोटी पाकणी सोलापूर शहर असे ठिकठिकाणी राज ठाकरे यांचे मनसेवकांसह नागरिकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत मनसे नेते बाळा नांदगावकर , अविनाश अभ्यंकर, बाबू वागस्कर, विनोद शिंदे आदी उपस्थित होते.

या ठिकठिकाणच्या स्वागत प्रसंगी मनसे नेते दिलीप धोत्रे, जैनुद्दीन शेख ,प्रशांत इंगळे, विनायक महिंद्रकर. प्रशांत इंगळे, अमर कुलकर्णी, ॲड कैलास खडके आदीसह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छुकांनी रात्री उशिरापर्यंत राज ठाकरे यांच्या गाठीभेटी घेत आपला प्रवेश निश्चित करून घेतला आहे. काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे तर काहींचा आज सकाळी प्रवेश वेळ देण्यात आला. सोलापूर शहरातील दिग्गज नेत्यांच्या मनसे प्रवेशामुळे मनसेची ताकद आणखीनच वाढणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.

तब्बल तीन वर्षानंतर राज ठाकरे यांनी सोलापूरचा दौरा केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top