द.ह. कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे शिक्षण सप्ताहात कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेत शिक्षण सप्ताहातील पाचवा उपक्रम कौशल्य व डिजिटल दिवस संपन्न झाला.

प्रारंभी प्रशालेचे उपमुख्याध्यापक एन.बी. बडवे सर व ज्येष्ठ शिक्षक अमित वाडेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळ सत्रामध्ये विद्यार्थ्यांची रंगीबेरंगी मुखवटे तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. या विद्यार्थ्यांना सौ.दळवी मॅडम, श्री.वेळापूरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.व्ही.पी.पवार सर, श्री. गवळी सर यांचे सहकार्य लाभले.

दुपार सत्रच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.एस.एस. कुलकर्णी मॅडम व सौ.भक्ती रत्नपारखी मॅडम यांनी प्रथमोपचार व मुलींचे आरोग्य या विषयावर पंढरपुर येथील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सौ. प्रिया भिंगे मॅडम यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सौ.निशा कलढोणे उपस्थित होत्या.मुख्याध्यापक व्ही.एम. कुलकर्णी सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

यावेळी डॉ सौ.प्रिया भिंगे मॅडम यांनी विविध आजारांवरती प्रथमोपचार कसे करावेत आणि मुलींच्या आरोग्याच्या समस्यांबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित मुलींचे विविध समस्या व शंका यांचे निरसन केले. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक एन बी बडवे सर,ज्येष्ठ शिक्षक आर.एस.कुलकर्णी सर,सौ.फडके मॅडम व विद्यार्थिनी उपस्थित होते.