इंडियन ह्यूमन राइट्स कौन्सिल यांच्यावतीने जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंग राजपूत यांचा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते विशेष सन्मान

इंडियन ह्यूमन राइट्स कौन्सिल यांच्यावतीने पुण्यात सोलापुरचे जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंग राजपूत यांचा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते विशेष सन्मान

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – इंडियन ह्यूमन राइट्स कौन्सिल यांच्यावतीने पुण्यातील गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी शनिवारी सोलापुरचे जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंग राजपूत यांचा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. ॲड प्रदीपसिंग राजपूत यांनी सुमारे शंभर पेक्षा जास्त आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तर दोन आरोपींना फाशीच्या शिक्षा मिळवून 100 पेक्षा जास्त कुटुंबांना न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश आंबेकर आणि पुण्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील ॲड एस.के.जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.

सत्काराच्या कार्यक्रमावेळी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या नवीन येणाऱ्या कायद्यांवर चर्चासत्राचे देखील आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्रामध्ये पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलीस प्रशासनाची बाजू मांडली .सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंह राजपूत यांनी सरकारी पक्षाच्यावतीने नवीन कायद्याला अनुसरून सरकारी पक्षाची आणि सरकारी वकिलांची भूमिका मांडली. ॲड.एस.के.जैन यांनी आरोपींच्यावतीने नवीन कायद्याला अनुसरून त्यांची भूमिका मांडली.निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आंबेकर यांनी न्यायाधीशांच्या भूमिकेतून आपली भूमिका मांडली.

यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की,या व अशा प्रकारचे चर्चासत्र वारंवार घडवून आणून कायद्याबाबत आणि लॉ अँड ऑर्डरबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत त्यास पोलीस प्रशासनाचे सहकार्य राहील. या आवाहनाला प्रतिसाद देत अशा प्रकारची चर्चासत्र घडवून आणण्याचे आश्वासन सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिले.

इंडियन ह्युमन राईट्स कौन्सिल च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.मुख्य संयोजक ॲड आशिष सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास पुणे अधिवक्ता परिषदेचे पदाधिकारी,धर्म जागरण विधी विभागाचे पदाधिकारी आणि पुण्यातील वकील वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रगीताने झाली तर सांगता वंदे मातरम ने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top