माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते २५० कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे वाट

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सक्रिय जीवित नोंद असणा-या कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून पंढरपुरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले.या संचाचे वाटप माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.

गृहोपयोगी संच्यामध्ये ताट – ४, वाट्या – ८, पाण्याचे ग्लास – ४, पातेले झाकणासह – ३, मोठा चमचा -३, पाण्याचा जग , मसाला डब्बा, डब्बे -३, परात , प्रेशर कुकर पाच लिटर, कढई, स्टील टाकी मोठी, एकूण ३० नगांचा समावेश होतो.

यावेळी परिचारकांनी मार्गदर्शन करताना कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.कामगार कल्याण मंडळ स्वातंत्र्यापासून अस्तित्वात आहे परंतु ख-या अर्थाने विविध योजनांचा लाभ सध्या मिळत आहे.शैक्षणिक, आर्थिक,आरोग्य,सामाजिक योजनांचा लाभ कामगारांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी रवी सर्वगोड, प्रदीप परकळे, शाहू सर्वगोड,किशोर कदम,समाधान भोसले, ज्ञानोबा सर्वगोड,सतीश सर्वगोड,राजेंद्र सर्वगोड,प्रवीण माने,लक्ष्मण बंगाळे,तुकाराम मोळावडे,शरद सोनवणे,अमोल पाटील, आण्णा सर्वगोड,स्वप्नील कांबळे, सुरज साखरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top