कर्मचाऱ्याला केलेल्या शिवीगाळीबद्दल काम बंद आंदोलन- विनोद पाटील अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी कर्मचारी संघ पंढरपूर
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.03 – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कर्मचारी अनंता रोपळकर यांना आज दि.3 जुलै 2024 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे मंदिर समितीने नेमून दिलेले कर्तव्य पार पाडत असताना शशीकांत पाटील तालुकाध्यक्ष मनसे पंढरपूर या इसमाने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे.
या शशीकांत पाटील नामक इसमास श्री विठ्ठल रुक्मिणी माता चांगली सद्गबुध्दी देवो व घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या दि.4 जुलै, 2024 रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचारी सकाळी 10 पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे नित्य उपचार वगळता इतर सर्व कामकाज बंद ठेवून आंदोलन करणार आहेत.
मंदिर समितीचे सर्व कर्मचारी या घडलेल्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात दुखावले आहेत. मंदिर समितीचे कर्मचारी नेमून दिलेले कर्तव्य सेवाभावी वृत्तीने जबाबदारीने पार पाडत आहेत.तथापि अशा घटनांमुळे प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे.
वरील सर्व बाबी विचारात घेता संबंधित व्यक्तींना पांडुरंग चांगली सद्बुद्धी देवो व अशा गैरवर्तन करणाऱ्या इसमावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी व अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी उद्या सकाळी दहा पासून श्री चे नित्योपचार वगळता इतर कामकाज बंद ठेऊन आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली.