सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न संसदेत मांडण्याची संधी मिळाली – खासदार प्रणितीताई शिंदे

सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –प्रणितीताई शिंदे या लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात खासदार म्हणून पहिल्यांदाच पाऊल टाकताना नवी दिल्ली येथे संसद भवनाच्या प्रवेशद्वारासमोर नतमस्तक झाल्या.

नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे या गेल्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्रात आमदार म्हणून जनतेची सेवा करत असताना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी विश्वास आणि मतरूपी दिलेले आशीर्वादामुळे पहिल्यांदाच खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न संसदेत मांडण्याची संधी मिळाली याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळावे अशी मनोमन प्रार्थना देखील शपथविधीच्या आधी संसद भवनाच्या प्रवेशद्वारासमोर खासदार प्रणिती शिंदे यांनी नतमस्तक होऊन केली.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आपली सुकन्या काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासोबत मंगळवारी नवी दिल्लीत 18 व्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसद सभागृहाच्या आवारात उपस्थित होते.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस खासदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी संविधान हातात घेऊन खासदारकीची शपथ घेतली.