पालवी येथे प.पूज्य विश्वकल्याण विजयजी महाराज गोशाळा उद्घाटन संपन्न..
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४ – पालवी पंढरपूर दि.20 जून , गुरुवार रोजी विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प पालवी या ठिकाणी परमपूज्य विश्वकल्याण विजयजी महाराज गोशाळे चा शुभारंभ संपन्न झाला.
यावेळी गोठ्यातील गोमातेला पुरणाचे उंडे अर्पण करून नवीन गोठ्यात प्रवेश करण्यात आला. सद्यस्थितीत आठ गोमाता यांची या गोशाळेत सेवा सुरू करण्यात आली आहे.
पालवी प्रकल्पात शेकडो अनाथ निराधार बालके जीवन आनंदाने जगत आहेत. या प्रकल्पात अगदी एका दिवसाच्या बाळापासून 80 वर्षाच्या वयोवृद्ध आजी-आजोबा देखील आहेत.या नवजात शिशूंसाठी सातत्याने दूध पावडर लागते. म्हणूनच गोसेवा व्हावी व बाळांनाही एक सकस पूर्ण आहार म्हणून गाईचं दूध मिळावं यासाठी देशी गाईंची पालवीमध्ये एक गोशाळा उभारली आहे.यावेळी पालवी प्रकल्पाच्या संचालिका सौ.मंगलताई शहा,वकील- सौ.ऋतुजा शहा,आशिष शहा, सुहास पाटील, संगम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क
पालवी प्रकल्प कोर्टी रोड , पंढरपूर
संपर्क – ९६७३६६४४५५,९८६००६९९४९
www.palawi.org