डॉ.निलम गोऱ्हे यांनी सौ.सुनेत्रा अजित पवार यांना शाल आणि पुष्पगुच्छ देत दिल्या त्यांच्या भावी राजकीय कारकीर्दीस शुभेच्छा
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ जून २०२४- राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने सौ.सुनेत्रा अजित पवार यांनी दि.१३ जून २०२४ रोजी विधानभवन येथे राज्यसभेचा फॉर्म भरला. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या दालनास त्यांनी भेट दिली.
यावेळी डॉ.निलम गोऱ्हे यांनी सौ.सुनेत्रा अजित पवार यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देत त्यांच्या भावी राजकीय कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी मंत्री आदिती तटकरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.