माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट केले आभार व्यक्त

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले.

त्यावेळेस सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,धनंजय डिकोळे, उपजिल्हाप्रमुख नामदेव वाघमारे, तालुका प्रमुख संतोष राऊत, बंडू घोडके, सूर्यकांत घाडगे, कमरुद्दीन खतीब, रणजित कदम, युवासेनेचे जिल्हा अधिकारी गणेश इंगळे, ऋषिकेश कवडे,तुषार इंगळे,अरविंद पाटील, संदीप कदम,महादेव बंडगर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.