पंढरपूर मध्ये आजपासून सिध्द समाधी योग या शिबीराची सुरूवात
टीम एस.एस.वाय.चा उपक्रम
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०५/०६/२०२४- आज दि.०५ जून २०२४ पासून दि.१४ जून, २०२४ पर्यंत पंढरपूर रेल्वे लाईन लगत असलेल्या द.ह.कवठेकर हायस्कूल मध्ये एस.एस.वाय.अर्थात सिध्द समाधी योग या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे .
योग ब्रह्मा ऋषि प्रभाकर यांनी तयार केलेल्या आराखडा व संहितेनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरा द्वारे आनंदी जीवन जगण्यासाठी परिपूर्ण मार्ग मिळणार आहे,अशी माहिती जेष्ठ प्रशिक्षक संतोष गुरुजी यांनी दिली.
आरोग्य सुव्यवस्थित ठेवून मानसिक क्षमता वाढविल्यास मन प्रसन्न व शांत राहते आणि आपली एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते. यासाठी टीम एस.एस.वाय.पंढरपूर यांच्या तर्फे सिध्द समाधी योग शिबीरा चे आयोजन करण्यात आले आहे. वय १४ वर्षे पासून ते ८० वर्षापर्यंतचे सर्व नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात.
योग ब्रह्मा ऋषि प्रभाकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या व त्यांच्या संहितेनुसार चालू असलेल्या संस्थेचे तज्ञ प्रशिक्षक संतोष गुरुजी यांनी हे शिबीर आयोजिले आहे. सदरचे शिबिर म्हणजे सायन्स ऑफ सायलेन्स योगा म्हणजे आनंदी जीवन जगण्याचा सर्वोत्तम तथा परिपूर्ण मार्ग असे त्यांनी सांगितले.
हे शिबिर दि.०५ जून रोजी संध्याकाळी ०६.००वा.सर्वांसाठी खुले असेल तर दि.०६ जून ते दि.१० जून पर्यंत सकाळी ०६ .०० ते ०९.०० वाजेपर्यंत आणि दि.११ जून रोजी सकाळी ०७.०० ते सायं.५.०० वाजेपर्यंत तर दि. १२ जून रोजी सकाळी ०९.०० ते १४ जून रोजी सायं. ०५.०० पर्यंत निसर्गाच्या कुशीत ‘रिट्रिट’ होणार आहे. त्यानंतर दि. १६ जून रोजी सायंकाळी ६.०० वाजता सिद्ध समाधी योग च्या माध्यमातून फॅमिली डे साजरा होणार आहे.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ‘टीम एस. एस.वाय.’ चे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत अशी माहिती दादासाहेब रोंगे,राहुल पटवर्धन,अरुण सरवदे यांनी दिली आहे.