सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१/०५/२०२४ – शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चार हुतात्मा पुतळा पार्क येथे त्यांच्या पुतळ्यास काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी मा.नगरसेवक विनोद भोसले, धनगर समाजाचे युवा नेते शैलेश पिसे,मध्यवर्ती अध्यक्ष अमर हल्ली, महिलाध्यक्षा प्रमिला तुपलवंडे,तिरुपती परकीपंडला,अंबादास गुत्तिकोंडा, भीमाशंकर टेकाळे, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी,पशुपती माशाळ,पृथ्वीराज नरोटे,हेमाताई चिंचोलकर,संजय वाघमारे, संजय गायकवाड,चक्रपाणी गज्जम,जितू वाडेकर,लखन गायकवाड,सागर उबाळे, मल्लिनाथ सोलापूरे,मधुकर आठवले,नागेश म्हेत्रे,शोभा बोबे,मोहसीन फुलारी,शंकर नरोटे,प्रियांका गूंडला,सायमन गट्टू, अप्पासाहेब सलगर, सुरेखा पाटील, अंबुबाई शेजाळ,शकुर शेख, अभिलाष अच्युगटला, दत्तात्रय गजभार, सरदार कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
