मास्टर्सच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा जोकोविच सर्वात वयस्कर खेळाडू ठरला


novak djokovi
नोवाक जोकोविचने अमेरिकेच्या सेबास्टियन कोर्डाचा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. एटीपी मास्टर्स 1000 टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा तो सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला. अशाप्रकारे, 37 वर्षीय जोकोविचने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत सातव्या जेतेपदाच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले आहे.

ALSO READ: पहिल्या फेरीत पराभव पत्करून पीव्ही सिंधू बाहेर
गुरुवारी झालेल्या त्यांच्या क्वार्टरफायनल सामन्यात जोकोविचने एक तास 24 मिनिटांत कोर्दाचा 6-3, 7-6 (7-4)  असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हशी होईल. जोकोविचने 33 वर्षीय दिमित्रोव्हविरुद्ध खेळलेल्या13 पैकी12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

ALSO READ: आयओसीचा मोठा निर्णय,ऑलिंपिक 2028 मध्ये बॉक्सिंगचा समावेश

दिवसाच्या पहिल्या पुरुषांच्या क्वार्टरफायनलमध्ये, चेक प्रजासत्ताकच्या बिगरमानांकित किशोरवयीन खेळाडू जाकुब मेन्सिकने फ्रान्सच्या 17 व्या मानांकित आर्थर फिल्सचा 7-6 (7-5), 6-1 असा पराभव केला. 19 वर्षीय मेन्सिकने पहिल्यांदाच एटीपी 1000 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

ALSO READ: Tennis: फिलीपिन्सच्या 19 वर्षीय अलेक्झांड्राने मोठा धक्का स्वाएटेकला पराभूत केले
बुधवारी फिल्सने अव्वल मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला पण19 वर्षीय मेन्सिकविरुद्ध तो हा पराक्रम पुन्हा करू शकला नाही. जगात 54 व्या क्रमांकावर असलेल्या मेन्सिकचा पुढील सामना उपांत्य फेरीत टेलर फ्रिट्झशी होईल, ज्याने इटलीच्या मॅटेओ बेरेटिनीचा7-5, 6-7, 7-5 असा पराभव केला.

 

Edited By – Priya Dixit

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top