घरकुल लाभार्थीधारकांना महसूल विभागाच्या आदेशानुसार मोफत वाळु मिळवी यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संर्घष समिती व युवासेना शिवसेनेच्यावतीने निवेदन
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०३/२०२५- घरकुल लाभार्थीधारकांना महसूल विभागाच्या आदेशानुसार मोफत वाळु मिळणेबाबत तहसीलदार यांना तहसील कार्यालय पंढरपूर जि.सोलापूर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संर्घष समिती व युवासेना शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.

या दिलेल्या निवेदनात २२ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली वाळू योजना व वाळू धोरण अंतिम न झाल्याने त्या वाळु ठेक्याचे लिलाव होऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील घरकुल लाभार्थी धारक वाळू धोरण अंतिम होण्याची वाट पाहत आहेत.त्यामुळे महसूल विभागा च्या आदेशानुसार घरकुल लाभार्थ्यांना सुमारे पाच ब्रास वाळू मोफत मिळावी. या मोफत मिळणाऱ्या वाळूच्या अनुषंगाने अवैध वाळू उपसा,वाळू चोरी होणार नाही शिवाय गुन्हे ही दाखल होणार नाहीत व घरकुलधारकांना घरकुल बांधण्यास सोयीचे होईल.
महाराष्ट्र शासनाची वाळू योजना लवकरात लवकर चालु करावी अशी युवासेना पंढरपूर तालुक्याच्यावतीने आज पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन देत विनंती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संर्घष समितीचे तालुकाध्यक्ष तथा युवासेना शिवसेनेचे पंढरपूर उपतालुका युवाअधिकारी समाधान इंद्रजीत गोरे आढीव,शिवसेना शाखाध्यक्ष औदुंबर चव्हाण, नवनाथ वाघ, प्रणित पवार, सागर चव्हाण तसेच युवासेना शिवसेनेचे पंढरपूर शहर आणि तालुका युवा पदाधिकारी,कार्यकर्ते व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संर्घष समिती पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.