श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान व शिलेदार ग्रुप चा समाज भुषण पुरस्कार काकासाहेब बुराडे यांना जाहीर…
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान व शिलेदार ग्रुप महाराष्ट्र राज्य चा समाजभुषण पुरस्कार भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बाबुराव बुराडे यांना जाहीर झाला आहे .८ जुन रोजी मोहोळ येथे मान्यवरांचे उपस्थित या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
सर्व शाखीय सोनार समाजाचे एकञीकरण व संत नरहरी महाराज सोनार यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सदैव कार्यरत असणारे जेष्ठ समाजसेवक काकासाहेब बुराडे यांच्या कार्याची दखल श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठानने घेऊन त्यांना समाजभुषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संतोष सोनार मोहोळ यांनी दिली आहे.