कुणाल कामरा तोंड सांभाळून बोल शिवसैनिकांना काय करायचे ते करायला वेळ लागणार नाही..

कुणाल कामरा तोंड सांभाळून बोल शिवसैनिकांना काय करायचे ते करायला वेळ लागणार नाही..

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०३/२०२५- कुणाल कामरा याच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयीच्या अश्लाघ्य वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करत असून महाराष्ट्र ही छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे.या भूमीतील नेतृत्वाला आणि लोकप्रतिनिधींना अश्लाघ्य आणि हीन पातळीवर जाऊन हिणवण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. कुणाल कामरा नावाच्या तथाकथित स्टॅंड-अप कॉमेडियनने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी जे आक्षेपार्ह व संविधानविरोधी वक्तव्य केले आहे,त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी अनेक संकटांना तोंड देत, राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी सतत कार्यरत राहण्याचा वसा घेतला आहे. अशा नेत्याविषयी जाहीरपणे विनोदाच्या नावावर अश्लाघ्य भाषेत केले गेलेले हीन पातळीचे विनोद हे केवळ शिंदे साहेबांचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे.

लोकशाहीमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याला मान आहे,मात्र त्याच्या मर्यादा ओलांडून अत्यंत हीन दर्जाची भाषा सुसंस्कृत महाराष्ट्राला कधीही शोभणारी नाही.कुणाल कामराची ही भाषा कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.अशा बेजबाबदार वक्तव्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अन्यथा लोकप्रतिनिधींच्या प्रतिष्ठेचा आणि समाजाच्या भावनांचा अपमान होईल.

कुणाल कामरा याने आपली हीन पातळीची भाषा आणि अवमानकारक वक्तव्यांसाठी महाराष्ट्राच्या जनतेची आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा या कुणाल कामराचे काय करायचे ते करायला आम्हाला वेळ लागणार नाही. त्याच्यावर कायदेशीर कारवाईसाठी सक्षम यंत्रणांनी तातडीने पावले उचलावीत अशा भावना मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्यक्त केली आहे. शिवरायांचा आशीर्वाद लाभलेली महाराष्ट्राची जनता अशा अपमानकारक विधानांचा तीव्र प्रतिकार करील असेही ते पुढे म्हणाले.

Kunal Kamra ,Sanjay Raut, Dr Shrikant Eknath Shinde, Eknath Shinde,एकनाथ संभाजी शिंदे ,Uday Ravindra Samant ,Naresh Mhaske
shivsena,Pune,sanjayraut,EknathShinde,DrShrikantEknathShinde, hadapsar,निषेध,maharashtra,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top