मंगळवेढा येथे भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 400 प्रकरणे निकाली

मंगळवेढा येथे भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 400 प्रकरणे निकाली

1 कोटी 70 लाखांची वसुली..

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज-मंगळवेढा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये दोन पॅनल तयार करून 400 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून यामध्ये 1 कोटी 70 लाख 11 हजार 669 एवढी रक्कम तडजोडीमधून प्राप्त झाली आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे यु.पी.देवर्षी व तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष श्रीमती एस.एन.गंगवाल-शाह व विधीज्ञ संघ मंगळवेढा यांच्या सहकार्याने दि.22 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये मंगळवेढा येथे एकुण 2 पॅनल तयार करण्यात आले होते. पॅनल क्रमांक 1 चे पॅनल प्रमुख श्रीमती एस. एन.गंगवाल-शाह, दिवाणी व फौजदारी न्यायाधीश व पॅनल वकील म्हणून अ‍ॅड. ओ. आर.भुसे यांनी काम पाहिले.त्यांच्याकडे गुन्हा कबुल केलेली प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. पॅनल क्रमांक 2 चे पॅनल प्रमुख श्रीमती व्ही.के.पाटील सह.दिवाणी न्यायाधीश क.स्तर मंगळवेढा व पॅनल वकील म्हणून अ‍ॅड.के.बी.ढवण यांनी काम पाहिले. त्यांच्याकडे दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे, दाखलपुर्व प्रकरणे,आय.पी.सी. 188 ची प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.

सदर लोकअदालतीत 77 दाखल प्रकरणे निकाली करण्यात आली आहेत. दाखलपुर्व (बँक,पतसंस्था, नगरपालीका, ग्रामपंचायत यांच्या वसुलीची) एकुण 323 प्रकरणे निकाली झालेली आहेत.एकुण 400 निकाली प्रकरणांमधुन एक कोटी सत्तर लाख अकरा हजरा सहाशे एकोणसत्तर एवढी रक्कमेची तडजोड करण्यात आली.05 वर्षाहुन जुनी एकुण 05 प्रकरणे सदर लोकअदालतीत निकाली झाली. सदरचे लोकअदालत यशस्वी करणेकरीता विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.यु.डी.माने, उपाध्यक्ष अ‍ॅड.व्ही.वाय.बेदरे, सचिव अ‍ॅड.जे.डी.मुल्ला तसेच इतर सर्व विधीज्ञ यांनी सहकार्य केले. श्रीमती अ.धै.उत्पात सहा.अधिक्षक, विधी सेवा समिती कर्मचारी अकिल दरवाजकर व इतर नेमलेले सर्व न्यायालयीन कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.सदरचे महालोकअदालत सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top