माजी सभापती स्व.दत्ताजीराव भाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. २३/०३/२०२५ : मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती स्व.दत्ताजीराव भाकरे यांच्या २६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सोमवार दि.२४ मार्च रोजी सकाळी ९.०० वाजता दत्ताजीराव भाकरे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था येथे धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांचेसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे अशी माहिती दामाजी शुगरचे माजी संचालक सुरेश भाकरे यांनी दिली आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा आंधळगाव येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवा नेते दिनकर भाकरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.