आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 या स्पर्धेला दोन जून पासून होणार सुरुवात
आगामी आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 या स्पर्धेला दोन जून पासून सुरुवात होणार असून या स्पर्धेत एकूण वीस संघ सहभागी होणार आहेत. त्यापैकी 19 संघांनी आतापर्यंत आपल्या खेळाडूंची घोषणा केली होती. त्यानंतर आता सर्वात शेवटी पाकिस्तान क्रिकेट टीमने वर्ल्डकपसाठी संघ जाहीर केला आहे .
आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडिया वरून माहिती देताना सांगितले की, बाबर आजम हा पाकिस्तान टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेत नेतृत्व करणार आहे. वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर करण्याच्या 25 मे या अखेरच्या तारखेच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानने आपल्या टीमची घोषणा केली असून बाबर आजम याच्या नेतृत्वात वर्ल्ड कप संघात पाच गोलंदाज, तीन विकेट केपर, चार ऑलराऊंडर चा समावेश करण्यात आला आहे. मात्र आपल्या राखीव खेळाडूंची नाव पाकिस्तानने अद्याप जाहीर केलेले नाहीत.
पाकिस्तान आपल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात 6 जून रोजी अमेरिकेविरुद्ध करणार आहे. त्यानंतर पाकिस्तान वर्ल्ड कप मधील सर्वात मोठा सामना 9 जून रोजी आपला पारंपारिक कट्टर प्रतिस्पर्धी भारतीय संघाविरुद्ध खेळणार आहे.पाकिस्तान ज्या ग्रुप मध्ये आहे त्या ग्रुप मध्ये भारत, कॅनडा, आयर्लंड, यूएसए चा समावेश आहे.
पाकिस्तानची टी-20 वर्ल्ड कप साठीची टीम – बाबर आजम कप्तान ,अब्रार अहमद, आजम खान, फखर जमान, हारीस रऊफ,ईफ्तिकार अहमद,इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह,सईम अयूब,शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.