महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा वाढवून मिळावा, बायोमेट्रिक रेशन कार्डधारकांना ऑफलाईन धान्य द्यावे तसेच धान्य मिळत नसलेल्या रेशन कार्डधारकांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करून धान्य देण्यात यावे
खा.प्रणिती शिंदे यांनी केली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागणी
सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०३/२०२५ – केंद्रात सरकार बदलल्यापासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राला रेशन धान्याचा कोटा उद्दिष्टापेक्षा कमी मिळत आहे हा महाराष्ट्र व सोलापूरसह इतर जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांवर अन्याय आहे. म्हणून महाराष्ट्राला धान्याचा कोटा वाढवून मिळावा. त्याचप्रमाणे शेतकरी, बिडी कामगार, कष्टकरी कामगारांच्या कामामुळे त्यांच्या हातातील रेषा नष्ट होतात त्यामुळे त्यांचे बायोमेट्रिक होत नसल्याने रेशन दुकानातून धान्य मिळत नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन धान्य देण्यात यावे.
तसेच अनेक रेशन कार्डधारकांना रेशन दुकानातून धान्य मिळत नाही. त्या सर्वांचा अन्न सुरक्षा योजनेत समावेश करून धान्य देण्यात यावे,अशी मागणी सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे.