पुस्तक दान कल्पनेला चांगला प्रतिसाद – प्राचार्या सरदेसाई मॅडम
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सर्वच महाविद्यालय विद्यालय हायस्कूल मराठी शाळा यांच्या परीक्षा संपून शालांत परीक्षेचे निकाल लागून सुट्ट्याही सुरू झाल्या आहेत.जी मुले वरच्या वर्गात गेली आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपली जुनी पुस्तके कवडीमोल भावाने घालवण्यापेक्षा शाळेला दान देऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल याकरता मागील वर्षीची पुस्तके रद्दीला न घालता शाळेमध्ये देऊन सहकार्य करावे असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष पत्रकार नंदकुमार देशपांडे यांनी व्यक्त केले.
कर्मयोगी विद्यानिकेतन येथे या उपक्रमासाठी निकाला दिवशी पालकांना आपली पुस्तके शाळेला देऊन सहकार्य करा असे आवाहन करण्यात आले होते.त्याला प्रतिसाद म्हणून कर्मवीर विद्या निकेतन येथे चौथीच्या वर्गातून पाचवीच्या वर्गात गेलेल्या रुद्र अक्षय देशपांडे याची इयत्ता चौथीची सर्व विषयांची पुस्तके गरजूंना उपयोगी येतील म्हणून कर्मयोगी विद्यालयाच्या प्राचार्य प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम यांना चौथीची पुस्तके सुपूर्द केली. त्यावेळी ते बोलत होते.
कर्मयोगी विद्यानिकेतनचे मार्गदर्शक माजी आमदार प्रशांत परिचारक ,रोहन परिचारक यांच्या कल्पनेतून कर्मयोगी विद्या निकेतनच्या प्राचार्या सरदेसाई मॅडम यांनी ही पुस्तके दानाची कल्पना अंमलात आणली. त्याला प्रतिसाद उत्तम मिळत असल्याचे सरदेसाई मॅडम यांनी सांगितले.