पंढरपूरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारावे – यशवंत डोंबाळी
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- येत्या ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०० वा जयंती दिन असल्याने पंंढरपूर तिर्थक्षेत्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून भव्य स्मारक लवकरात लवकर व्हावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी केली आहे .
यासाठी आमदार समाधान आवताडे , आमदार अभिजीत पाटील व आमदार राजू खरे यांनी व राज्यातील धनगर समाजाच्या सर्व आमदारांनी लक्ष घालावे अशीही त्यांनी मागणी केली आहे .