सिद्धेवाडी येथे सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी या संस्थेचा 57 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज /शुभम लिगाडे,दि.8 फेब्रुवारी – पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथे सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी या संस्थेचा 57 वा वर्धापनदिन जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात देशभक्त कै. संभाजीराव शेंडे, कै. विठ्ठल कुलकर्णी,कै. प्रभाकर कुलकर्णी व सिद्धेवाडीचे समाजसुधारक कै.नवले यांच्या प्रतिमेचे पुजनाने करण्यात आली.
या कार्यक्रमात शिक्षकांनी आपली मनोगतं व्यक्त केली व संस्थेच्या कार्यबद्ध माहिती सांगितली.

प्रशालेचे मुख्याध्यापक ए.एस घोंगडे,व्ही.ए कुलकर्णी,डी.बी जाधव,एस.के पवार,व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना वर्धापनदिना निमित्त खाऊ वाटप करण्यात आला.