केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे आचार्य श्री विद्यासागर जी महाराजांच्या पहिल्या समाधी स्मृती महोत्सवाला आणि श्री १००८ सिद्धचक्र विधान विश्व शांती महायज्ञाला उपस्थिती लावली
आचार्य श्री विद्यासागर जी महाराज एक महान पुरुष होते, त्यांनी एक नवीन विचार आणि एक नवीन युग सुरू केले
आचार्य विद्यासागरजींच्या शरीराचा प्रत्येक कण आणि त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण धर्म,संस्कृती आणि राष्ट्रासाठी समर्पित होता
आचार्य विद्यासागरजींनी भारतीय भाषांच्या संवर्धनावर, देशाचा अभिमान जगभर पसरवण्यावर आणि देशाची ओळख india ऐवजी भारत ने करून देण्यावर भर दिला
जी-२० परिषदेच्या निमंत्रण पत्रावर भारताच्या पंतप्रधानांना लिहून, मोदींनी विद्यासागरजींचे विचार प्रत्यक्षात आणण्याचे काम केले
आचार्य विद्यासागर जी त्यांच्या कृतीतून भारताचे,भारतीय संस्कृतीचे,भारतीय भाषांचे आणि भारतीय अस्मितेचे प्रतिबिंब बनले
आचार्य विद्यासागर जी यांचे संदेश, प्रवचने आणि लेखन हे जैन समुदायासाठी तसेच संपूर्ण देशासाठी एक मौल्यवान वारसा

मोदींच्या नेतृत्वाखाली,भारत वसुधैव कुटुंबकम आणि अहिंसा परमो धर्माच्या तत्त्वांचा प्रचार करत आहे:
ज्या देशात अनेक भाषा, लिपी, बोली, व्याकरण आणि कथा आहेत, तो देश सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध
नवी दिल्ली/पीआयबी दिल्ली, ०६ फेब्रुवारी २०२५ – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज छत्तीसगड मधील राजनांदगाव येथे आचार्य गुरुवर श्री विद्यासागर जी महाराज यांच्या पहिल्या समाधी स्मृती महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित केले आणि श्री १००८ सिद्धचक्र विधान विश्व शांती महायज्ञात भाग घेतला. यावेळी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आचार्य श्री विद्यासागर जी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ₹ 100 चे स्मारक नाणे, ₹ 5 चे टपाल विभागाचे एक विशेष लिफाफा,108 पाऊलखुणा आणि चित्रांचे प्रकाशन केले आणि प्रस्तावित समाधी स्मारक विद्यायतनची पायाभरणी केली. या प्रसंगी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई, उपमुख्यमंत्री विजय शर्मा आणि पूज्य मुनी श्री समता सागर जी महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, आचार्य श्री विद्यासागर जी महाराज हे एक महान पुरुष होते ज्यांनी एक नवीन विचार आणि एक नवीन युग आणले. ते म्हणाले की, कर्नाटकात जन्मलेले आचार्य गुरुवर श्री विद्यासागर जी महामुनिराज हे त्यांच्या कर्मातून भारत,भारतीय संस्कृती, भारतीय भाषा आणि भारतीय अस्मितेचे प्रकाशमान झाले. श्री. शाह म्हणाले की, हा सन्मान क्वचितच कोणत्याही धार्मिक संताला मिळाला असता, ज्यांनी जगाला धर्म तसेच देशाची ओळख समजावून सांगितली आहे. ते म्हणाले की,आचार्य विद्यासागरजींच्या शरीराचा प्रत्येक कण आणि त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण धर्म, संस्कृती आणि राष्ट्रासाठी समर्पित होता.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, त्यांना आचार्य श्री विद्यासागर जी यांचा सहवास अनेक वेळा मिळाला आणि प्रत्येक वेळी आचार्य श्री विद्यासागर जी यांनी भारतीय भाषांच्या संवर्धनावर, देशाचा अभिमान जगभर पसरवण्यावर आणि देशाची ओळख india ऐवजी ‘भारत’ म्हणून ओळखली जाण्यावर भर दिला.
अमित शहा म्हणाले की, जी-२० शिखर परिषदेच्या निमंत्रण पत्रावर भारताचे पंतप्रधान असे लिहून मोदींनी विद्यासागरजीं चे विचार प्रत्यक्षात आणले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही राजकारण न करता आचार्यजींचे विचार अंमलात आणले आणि त्यांच्या संदेशाचे पालन करण्याचे काम केले.

केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, आचार्यजींनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तपश्चर्येचा मार्ग सोडला नाही. आचार्यजींनी त्यांच्या आध्यात्मिक उर्जेद्वारे केवळ जैन धर्माच्या अनुयायांनाच नव्हे तर जैनेतर अनुयायांनाही मोक्षाचा मार्ग दाखवण्याचे काम केले.
अमित शहा म्हणाले की, असे अनेक लोक आहेत जे म्हणतात की जीवनाचा प्रत्येक क्षण धर्म, राष्ट्र आणि समाजासाठी समर्पित केला पाहिजे. पण असे संपूर्ण आयुष्य जगणारे लोक क्वचितच दिसतात आणि आचार्यजींचे आयुष्य असेच होते. ते म्हणाले की, आचार्यजींनी काळानुसार अर्थ लावून संपूर्ण जगात ‘अहिंसा परम धर्म’ या तत्त्वाची स्थापना करण्याचे काम केले. ते म्हणाले की, आचार्य विद्यासागर जी महाराजांनी जैन धर्माच्या तत्वांनुसार त्यांचे शिष्य देखील त्याच तत्वांनुसार आपले जीवन जगतील याची काळजी घेतली.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत ‘वसुधैव कुटुंबकम’ आणि ‘अहिंसा परम धर्म’ या तत्त्वांचा प्रचार करत आहे. या प्रसंगी स्मारक नाणे आणि विशेष लिफाफा मंजूर केल्याबद्दल ते मोदीजींचे आभार मानतात असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आचार्यजींना दिलेली ही श्रद्धांजली संत परंपरेचा आदर आहे.
ते म्हणाले की, आचार्यजींचे प्रस्तावित समाधी स्मारक ‘विद्यायतन’ युगानुयुगे आचार्यजींच्या स्मृतीत राहील.

हे तत्वे, संदेश आणि शिकवणींचा प्रचार करण्याचे ठिकाण राहील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ज्या संतांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणाची उपासना करण्यात घालवले त्यांच्या समाधीचे नाव ‘विद्यायतन’ पेक्षा वेगळे असू शकत नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, या प्रसंगी मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात मोफत मुलींच्या शाळेची पायाभरणीही करण्यात आली. ते म्हणाले की या शाळेत कौशल्य विकास आणि रोजगार दोन्ही समाविष्ट असतील आणि अध्यापन मातृभाषेतून असेल. ते म्हणाले की, आचार्यजींच्या १०८ पदचिन्हांचे अनावरण करण्यात आले आहे जे त्याग, तपस्या आणि संयमाच्या जीवनाचा संदेश देतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सांगितले की, भारताची संत परंपरा खूप समृद्ध आहे. ते म्हणाले की जेव्हा जेव्हा देशाला कोणत्याही भूमिकेची आवश्यकता होती तेव्हा संत परंपरेने ती भूमिका बजावली. ते म्हणाले की, संतांनी ज्ञान निर्माण केले, देशाला एकतेच्या धाग्यात बांधले आणि गुलामगिरीच्या काळातही संतांनी भक्तीद्वारे राष्ट्रीय चेतनेची ज्योत तेवत ठेवली. स्वातंत्र्यानंतर जेव्हा देशाचे प्रशासन आणि देश पाश्चात्य विचारांनी प्रभावित होऊ लागला, तेव्हा विद्यासागर जी महाराज हे एकमेव आचार्य होते ज्यांनी स्वतःला भारत, भारतीयत्व आणि भारतीय संस्कृतीशी जोडलेले ठेवले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, संपूर्ण देशाला एकत्र आणण्यात जैन मुनींनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. उत्तर प्रदेशातील हस्तिनापूरपासून कर्नाटकातील श्रवणबेळगोळा, बिहारमधील राजगीरपासून गुजरातमधील गिरनारपर्यंत सर्वत्र पायी प्रवास करून त्यांनी आपल्या कृतीतून त्यागाचा संदेश दिला, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, आचार्यजींनी आपल्याला शिकवले की आपली ओळख आपल्या संस्कृतीत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सांगितले की, आचार्य विद्यासागर जी महाराजांनी मूकमाटी नावाचे एक हिंदी महाकाव्य रचले होते, ज्यावर अनेक लोकांनी संशोधन आणि निबंध लिहिले आहेत. सर्व भारतीय भाषांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या आचार्यजींच्या संदेशाचे अनुसरण करून, त्यांच्या अनुयायांनी ‘मूकमाटी’चे अनेक भाषांमध्ये भाषांतर केले आहे. ते म्हणाले की मूकमाटी मध्ये धर्म, तत्वज्ञान, नीतिमत्ता आणि अध्यात्म यांचे खूप खोलवर वर्णन केले आहे आणि ते शरीराच्या नश्वरतेचे वर्णन करते आणि देशभक्तीचा संदेश देते.
अमित शाह म्हणाले की, आचार्य विद्यासागर जी महाराजांचा असा विश्वास होता की आपल्या देशातील भाषिक विविधता ही आपली खरी ताकद आहे. ते म्हणाले की, ज्या देशात अनेक भाषा, लिपी आणि बोलीभाषा आहेत आणि विविध प्रकारचे व्याकरण आणि गद्य आहे तो देश सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध मानला जातो.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, मोदीजी आणि आचार्यजी यांच्यात अनेकवेळा खूप सौहार्दपूर्ण चर्चा झाली आहे. ते म्हणाले की, आचार्य विद्यासागरजींचे संदेश, प्रवचने आणि लेखन हे जैन समुदायासाठी तसेच संपूर्ण देशासाठी एक मौल्यवान वारसा आहे.