महाकुंभ मेळ्यातून संत-महंतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे लोकार्पण

महाकुंभ मेळ्यातून संत-महंतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे लोकार्पण

हिंदु राष्ट्राची राज्यघटना हे रामराज्याचे स्वरूप असेल – स्वामी आनंदस्वरूप महाराज, शांभवी पीठाधीश्वर

प्रयागराज/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०४/०२/२०२५ : भारत हिंदु राष्ट्र घोषित होणे, हे माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. स्वातंत्र्यानंतर हिंदूंची गुरुकुल शिक्षण पद्धती बंद करण्यात आली.राज्यघटनेद्वारे शाळांमध्ये हिंदूंना धर्मशिक्षण देण्यास प्रतिबंध आहे; मात्र मुसलमानांना मदरशांतून त्यांच्या इस्लाम पंथाचे शिक्षण दिले जात आहे. भारतात गुरुकुलमध्ये शिक्षण दिले गेले, तरच व्यभिचार, बलात्कार, भ्रष्टाचार बंद होतील. आपल्या श्रीमद्भगद्गीतेमध्ये कधी सुधारणा झाली आहे का?परंतु राज्यघटने मध्ये १०० हून अधिक बदल करण्यात आले आहे. सध्याच्या राज्यघटनेमध्ये हिंदूंना दुय्यम स्थान दिले गेले आहे; मात्र हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेत ‘हिंदु’ हाच केंद्रबिंदू असेल.हिंदु राष्ट्राची राज्यघटनेत कोणत्याही अन्य पंथांना विरोध नसेल. हिंदु राष्ट्राची राज्यघटना हे रामराज्याचे स्वरूप असेल,असे प्रतिपादन काली सेना संस्थापक तथा शांभवी पीठाधीश्वर प.पू.स्वामी आनंदस्वरूपजी महाराज यांनी हिंदु राष्ट्र अधिवेशनात केले.या अधिवेशनात आनंदस्वरूपजी महाराजांनी हम हिंदू है… या हिंदु राष्ट्र गीताचे लोकार्पण केले.

कोट्यवधी हिंदूंची आस्था असलेल्या महाकुंभपर्वांत उपस्थित संत-महंतांनी भारताला हिंदु राष्ट्र करण्याची घोषणा केली.आज समस्त संतांच्या वंदनीय उपस्थितीत हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे प्रारूपाचे लोकार्पण करण्यात आले. काली सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदु राष्ट्र अधिवेशन सेक्टर ९ येथे शांभवी पीठाच्या काली सेनेच्या शिबिरामध्ये पार पडले.धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्राची स्थापना करून ते चालवण्यासाठी पुढाकार घेण्याचा संकल्प उपस्थित सर्व संत-महंतांनी केला.

धर्मशिक्षण,धर्मजागृती तथा हिंदूसंघटन यांद्वारे हिंदु राष्ट्राची स्थापना- सद्गुरु डॉ.चारुदत्त पिंगळे

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ.चारुदत्त पिंगळे म्हणाले की,१८ व्या शतकापर्यंत भारत एक स्वयंभू हिंदु राष्ट्र आणि आर्थिक महासत्ता होता. त्या काळी भारत वैश्विक व्यापार्‍यात अग्रस्थानी होता.आज सेक्युलर शासनप्रणालीमुळे आपली स्थिती काय झाली आहे ? आज अन्य पंथियांच्या देशात त्या त्या पंथाच्या लोकांची प्राधान्याने काळजी घेतली जाते; परंतु भारत हिंदुबहुल असतांनाही हिंदुहिताचे रक्षण केले जात नाही. त्यामुळेच भारतात हिंदु राष्ट्र होणे आवश्यक आहे.धर्मशिक्षण, धर्मजागृती तथा हिंदूसंघटन यांद्वारे हिंदु राष्ट्राची स्थापना करणे हे हिंदू समाज आणि देश यांना वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संपूर्ण भारतात दिग्विजय यात्रा काढावी – गोविंदानंद सरस्वती,ज्योतिर्मठ

कोणतेही कार्य शास्त्रप्रमाणीत असायला हवे. आद्य शंकराचार्यांनी शास्त्राच्या आधारेच सनातन धर्माविषयी जागृती केली. आद्य शंकराचार्यांनी हिंदु राष्ट्राच्या पुर्नस्थापनेसाठी चार पिठांची निर्मिती केली.भगवान श्रीकृष्ण, श्रीराम यांनी धर्माच्या रक्षणासाठीच अवतार घेतला.हिंदू स्वधर्माला विसरले आहेत. त्यांना सनातन हिंदु धर्माची आठवण करून देणे, हे संतांचे कार्य आहे. हिंदु राष्ट्राच्या जागृतीसाठी संपूर्ण भारतामध्ये दिग्विजय यात्रा काढण्यात यावी. यासाठी संतांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्योतिर्मठाचे दंडी स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी या वेळी केले.

मेकॉलेप्रणीत नव्हे तर गुरुकुल शिक्षणाने हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य- श्री श्री १००८ जागृत चेतनागिरी

कुंभमेळ्यात हिंदु राष्ट्राचे फलक हटवण्यात आले. भारतामध्ये हिंदु राष्ट्राचे फलक हटवले जात असतील तर हिंदु राष्ट्राची स्थापना कशी होणार ? हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी राज्यतंत्र आणि धर्मतंत्र यांचे एकत्रीकरण आवश्यक आहे.धर्मस्थापनेसाठी हिंदूंना शक्तीची आवश्यकता आहे.गुरुकुल शिक्षणपद्धती आणि मातृशक्ती यातूनच हिंदूंना शक्ती प्राप्त होईल. त्यातूनच हिंदु राष्ट्राची स्थापन होईल,असे प्रतिपादन महामंडलेश्वर श्री श्री १००८ जागृत चेतनागिरी यांनी केले.

संतांच्या नेतृत्वाखालीच पुन्हा हिंदु राष्ट्राची संस्थापना होईल- सद्गुरु नीलेश सिंगबाळ

काली सेनेद्वारे प्रसारित केलेले हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेचे प्रारूप म्हणजे आपण हिंदु राष्ट्राच्या सीमेवर असल्याचे द्योतक आहे.ही सीमा पार करून आपणाला हिंदु राष्ट्रात पाऊल टाकायचे आहे. सनातन धर्मावर प्रत्येक युगात आघात झाले आहे.त्यावेळी रक्षणासाठी संतांनी नेतृत्व घेऊन हिंदु राष्ट्राच्या संस्थापनेसाठी पुढाकार घेतला.

आता पुन्हा हिंदु राष्ट्राच्या संस्थापनेसाठी संतांनी पुढाकार घेतला आहे.संतांच्या नेतृत्वाखालीच पुन्हा हिंदु राष्ट्राची संस्थापना होईल,असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी सामर्थ्यशाली व्हावे-कामेश्वरपुरी महाराज, जुना पंचदशनाम आखाडा

सेक्युलर या शब्दामुळे हिंदू निष्क्रीय झाले आहेत.घर बनवतांना ज्याप्रमाणे अनेक वस्तूंची आवश्यकता असते. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीही विविध योगदानाची आवश्यकता आहे.हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धन,कौशल्ययुक्त पिढीची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी सामर्थ्यशाली व्हावे,असे आवाहन जुना पंचदशनाम आखाड्याचे कामेश्वरपुरी महाराज यांनी केले.

या अधिवेशनात बांगलादेश व पाकिस्तान मधील हिंदूंवरील वाढते अत्याचार; बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांमुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला निर्माण झालेला धोका, काशी मथुरा यांसह अन्य मंदिरांच्या मुक्तीचा संवैधानिक लढा हिंदु मंदिरांचे सरकारीकरण; भारतभर उत्सवांच्या वेळी हिंदूंवर होत असलेली आक्रमणे; लव्ह जिहाद, धर्मांतर, आतंकवाद, दंगली आदी समस्यांवर संत-महंत यांनी विचारमंथन केले.हिंदु जनजागृती समितीचे सुनील कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top