बालबाजारातून आर्थिक व व्यावहारिक ज्ञान वाढविण्यासाठी मदत होते-सौ राजश्री दोशी
म्हसवड/ज्ञानप्रवाह न्यूज- शालेय जीवनात आर्थिक व व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी बालबाजार व महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन मासाळवाडी येथील माणगंगा पॅरामेडिकल कॉलेजच्यावतीने करण्यात आले होते.अहिंसा पतसंस्थेच्या संचालिका सौ राजश्री दोशी यांचे हस्ते बालबाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ.सविता मासाळ आदी उपस्थित होते.

मासाळवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांनी या बाजारामध्ये पालेभाज्या, फळभाज्या व खाद्य पदार्थ विक्रीस आणले होते.हे सर्व खरेदीसाठी परिसरातील महिला नागरिकांनी या बालबाजारात गर्दी केली होती.या बालबाजाराच्या निमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल झाल्याने बालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

याप्रसंगी बोलताना सौ राजश्री नितीन दोशी म्हणाल्या की,अशा प्रकाराच्या बालबाजारातून आर्थिक व व्यावहारिक ज्ञान वाढविण्यासाठी मदत होते.

यावेळी संस्थेच्या वतीने महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. हा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला.

अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष नितीन दोशी म्हणाले, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारातून विकास होऊ शकतो ते ज्ञान बालबाजारतून मिळते.संस्थेने हा चांगला उपक्रम राबविला आहे.

संस्थाप्रमुख डॉ.वसंत मासाळ व व्यवस्थापकीय संचालक रावसाहेब मासाळ यांनी स्वागत केले.बालबाजार लहान मुला- मुलींनी गजबजून गेला होता.या संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बालबाजार यशस्वी संपन्न होण्यासाठी प्रयत्न केले.सर्व विद्यार्थी व पालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.