शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संविधान अमृत महोत्सव अभिवादन कार्यक्रम संपन्न
शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ व जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.२५/०१/२०२५- शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ व जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायंकाळी ६ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान व भारतमाता यांचे पूजन करून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी संविधान बचाव देश बचाव च्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी तालुकाप्रमुख बंडू घोडके, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे,उपतालुकाप्रमुख उत्तम कराळे,नागेश रितुंड, संजय घोडके,मा उपशहरप्रमुख बाळासाहेब देवकर, नागनाथ देडके ,नामदेव चव्हाण,शेखर ननवरे,धनाजी भोसले, जीवन चव्हाण,दादा टकले ,समाधान गिड्डे,महिला आघाडीच्या अनिताताई आसबे,मंजूळाताई दोडमिशे आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.