पालकांनी मुलांच्या वैज्ञानिक दृष्टिकोणाकडे लक्ष द्यावे-शिवाजी शिंदे
करकंब येथे विज्ञान प्रदर्शनात 161 विद्यार्थ्यांचा सहभाग
युवा उद्योजक अमोल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

करकंब/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०२/२०२५- मुलांना सध्याच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञान याची आवड निर्माण करावयाची असेल तर त्यांना मोबाईलपासून दूर ठेऊन पालकांनी मुलांमधील वैज्ञानिक दृष्टिकोण लक्षात घेऊन त्याकडे लक्ष दिल्यास मुले भविष्यात नक्कीच विविध विज्ञान क्षेत्रात भरारी घेतील.याच पार्श्वभूमीवर करकंब येथील युवा उद्योजक अमोल शेळके यांनी वाढदिवसानिमित्त भावी वैज्ञानिकांना विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून वाव मिळवून दिला आहे, असे मत दै.पंढरी भूषणचे संस्थापक संपादक शिवाजीराव शिंदे सर यांनी व्यक्त केले.
करकंब येथील अभिछाया प्रतिष्ठाण संचलित अमोल विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अमोल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.11 रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शिंदे बोलत होते.
उपसरपंच आदिनाथ देशमुख यांनी करकंब परिसरातील मुलांना विविध वैज्ञानिक प्रयोग करीत असताना त्यांना भविष्यात येणार्या अडचणींना मदत करून करकंब परिसरात जास्तीत जास्त शास्त्रज्ञ निर्माण कसे होतील यासाठी मदत केली जाईल असे सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले करकंब केंद्राचे माजी केंद्रप्रमुख तथा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक रविकिरण वेळापूरकर यांनी विद्यार्थ्यांनी चिकित्सक असावे,सतत प्रश्न विचारावेत,काही तरी देशहितासाठी नवनिर्माण करावे,पहिले यश मिळाल्यावर विश्रांती घेऊ नये आणि भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे कार्य व त्यांचे विचार मांडले.
विज्ञान प्रदर्शनात पाणी व त्याचे महत्त्व,सौर ऊर्जा व निसर्ग संवर्धन, पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण,हवा व तिचे महत्व,चंद्र व ग्रह, इलेक्ट्रिक सर्किट,जंतू व त्याची विविधता या विषयावर विविध 161 प्रयोग मांडण्यात आले होते.
यावेळी संस्थापक अध्यक्ष अमोल शेळके, सचिव सुरेखा शेळके,डॉ.मृदुला तळेकर,प्रा. प्रवीण रुपनवर,चेतना विकास संस्था अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे,माजी ग्रा.पं.सदस्य सुनील मोहिते, उद्योजक परमेश्वर धोत्रे, प्रा.किसन सलगर,प्रा.अजित पवार आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.किसन सलगर यांनी केले.आभारप्रदर्शन दीपक उंबरदंड यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
गट अ-1 ली ते 2 री-प्रथम-वॉटर सायकल-धैर्य विवेक शिंगटे इयत्ता 1 ली (अमोल विद्यालय करकंब), द्वितीय-पाण्याचे महत्व-इशा विनोद पवार, रिद्धी योगेश पिसे, आरती नितीन कुंभार,आरोही विक्रांत आरकस (जि.प.प्रा. मुली क्र.1 करकंब), तृतीय-एयर वॉटर पोल्युशन-श्रीराम उमेश गोडसे (अमोल विद्यालय करकंब)
गट ब-3 री ते 4 थी-प्रथम-सौर ऊर्जा व निसर्ग संवर्धन-आरव गणेश पिसे, आरुष गणेश पिसे (अमोल विद्यालय करकंब), द्वितीय-जनरेटिंग वाइंड एनर्जी-संस्कार परमेश्वर गोडसे, अविराज पांडुरंग हेगडकर, पार्थ बाळासो हेगडकर,ओम किरण गारुडे (अमोल विद्यालय, करकंब), तृतीय-सूर्यमाला-सैफउल्लाह वसीम बागवान (जि.प. प्रा. मुले क्र. 2 करकंब).
गट क-5 वी ते 7 वी-प्रथम-सोलर सिस्टिम मॉडेल-शिवतेज प्रवीण गुळमे, निलराज युवराज शिवपालक, सोहम कृष्णा शिंदे, यशराज विठ्ठल गुळमे (अमोल विद्यालय करकंब), द्वितीय-मीनी गॅस-सुरज दीपक व्यवहारे, श्रीशैल्य रवींद्र बोचरे (आदर्श प्रशाला, करकंब), तृतीय-चंद्रयान-साई धनंजय ढोबळे (रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंब).
गट ड-8 वी ते 10 वी-प्रथम-स्मार्ट सस्टेनेबल व्हिलेज-समर्थ संजय दीक्षित (यशवंत विद्यालय भोसे), द्वितीय-पोल्युशन कंट्रोल मॉडेल-ऋतुजा महादेव कोरके (यशवंत विद्यालय भोसे), तृतीय-हायड्रोपॉनिक फार्मिंग-गौरी दादासो माळी (डॉ. फाळके प्रशाला पांढरेवाडी).यासाठी परीक्षक म्हणून नितीन जाधव, रोहिणी बुरकुल व व्यंकटेश काटकर यांनी काम पाहिले.
