मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी

पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/१२/२०२४ : पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्र. २९१/२०२४ नोंदवण्यात आला आहे.सदर आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे.आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीला दुकानामध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील कृत्य केले.

रविवार दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी ही मुलगी दुकानात गेली असता आरोपीने तिच्यासोबत अश्लील चाळे केले.हा घडलेला प्रकार मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितला.यानंतर पालकांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला .

आरोपीचे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासवणारे आहे, अशा नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश या प्रकरणात शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पालघर  पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना दिले आहेत.

सदर घटनेचा तपास लवकरात लवकर करुन संबंधित मुलीला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात यावा असं सांगून उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही यावेळी दिलेल्या आहेत यात घटनेचा तपास अधिक जलद गतीने करत आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी. आरोपीला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणे त्याचबरोबर जामीनास कडाडून विरोध करण्यात यावा,पीडित मुलीचे समुपदेशन व शालेय शिक्षण चालू राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top