अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई
दोन टिपर व एक पिक अप जीप जप्त
पंढरपूर दि.20:- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथका व्दारे गोपाळपूर ता.पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन टिपर व एक पिक अप जीप अशी 3 वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे व तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.दि.19 डिसेंबर 2024 रोजी गोपाळपूर येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन टिपर व एक पिक अप जीप अशी 3 वाहने जप्त करण्यात आली असून,सदर वाहने शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे लावण्यात आली आहेत.

या भरारी पथकात मंडळ अधिकारी विजय शिवशरण, राजेंद्र वाघमारे, पंकज राठोड, ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगडाळे , पियुष भोसले, प्रमोद खंडागळे,महेश सावंत, गणेश पिसे, संजय खंडागळे,समीर पटेल, मंगेश बनसोडे , रविकिरण लोखंडे,पी.पी.कोईगडे,आर बी खंदारे व पंढरपूर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी सहभागी होते.
