MUM vs MP: मुंबईचे देशांतर्गत क्रिकेटवर वर्चस्व,जिंकले सय्यद मुश्ताक ट्रॉफीचे विजेतेपद



मुंबईने रविवारी मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव करत सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने दुसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. यापूर्वी, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संघाने 2022/23 मध्ये विजेतेपदावर कब्जा केला होता.

मुंबईने तीन जेतेपदे पटकावली यामध्ये रणजी करंडक, इराणी चषक आणि सय्यद मुश्ताक अली करंडक यांचा समावेश आहे. अशाप्रकारे मुंबई देशांतर्गत क्रिकेटचा नवा बादशहा बनला आहे. आतापर्यंत संघाने रणजी करंडक 42 वेळा, इराणी करंडक 15 वेळा, विजय हजारे ट्रॉफी चार वेळा आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन वेळा जिंकली आहे.रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना मार्चमध्ये मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.

विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. त्यांच्या दुसऱ्या डावात मुंबईने 418 धावा केल्या आणि त्यांची एकूण आघाडी 537 धावांची झाली आणि विदर्भासमोर 538 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ दुसऱ्या डावात 368 धावांत सर्वबाद झाला. यासह मुंबईने हा सामना 169 धावांनी जिंकला. 

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून मध्य प्रदेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीमुळे संघाने 20 षटकांत आठ गडी गमावून 174 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मुंबईने सूर्यकुमार यादवच्या 48 धावांच्या जबरदस्त खेळीमुळे 17.5 षटकांत पाच गडी गमावून 180 धावा केल्या आणि सामना जिंकला. 

Edited By – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top