उमेशचंद्र स्मृती चषक वक्तृत्व स्पर्धेत मुलींनी सर्वाधिक कमावली बक्षीसे

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- स्व.प्रा.उमेशचंद्र खेडकर स्मृती चषक वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्राथमिक विभागात जिल्हा परिषद शाळांनी तर माध्यमिक विभागात पंढरपूरच्या द.ह.कवठेकर प्रशालेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले.मुक्ता राऊत, भाविका वाजे,सानवी कलढोणे आणि स्नेहल जानकर अशा चारही मुलींनी चार गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवले. त्यामुळे उमेशचंद्र स्मृती चषकावर मुलींचे वर्चस्व दिसून आले.
उमेशचंद्र खेडकर मित्र परिवाराच्यावतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे गेल्या बारा वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या स्पर्धेत तब्बल 210 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. प्राथमिक विभागाचे दोन तर माध्यमिक विभागाचे दोन अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा होते. सोलापूर जिल्ह्यात अत्यंत नावाजलेली आणि मानाची स्पर्धा म्हणून सध्या उमेशचंद्र चषकाकडे पाहिले जाते.
उमेशचंद्र स्मृती चषक स्पर्धा रविवारी संपन्न झाली. यामध्ये प्राथमिक विभागातील बालगटात मुक्ता राऊत प्रथम, हर्षवर्धन क्षिरसागर द्वितीय,प्रज्ञेश पाठक तृतीय तर परि माळी आणि रेवा मिसाळ या दोन्ही विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

प्राथमिक विभागातील तिसरी आणि चौथी बालगटामध्ये भाविका वाजे प्रथम, गाथा मिले द्वितीय,तस्मय रत्नपारखी तृतीय तर अनघा कुलकर्णी आणि श्रावणी कोंडुभैरी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
माध्यमिक विभागातील पाचवी ते सातवी गटात स्नेहल जानकर प्रथम , मृण्मयी वहीत द्वितीय, आशिष दुपडे तृतीय तर आयुष्या पवार आणि गौरी भोसले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

माध्यमिक विभागातील आठवी ते दहावी गटात सानवी कलढोणे प्रथम , राधिका गोरे द्वितीय, साई तेंडुलकर तृतीय, तर सार्थक लेंगरे आणि श्रृती देठे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. चारही गटातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम स्मृतिचिन्ह असे बक्षीसाचे स्वरूप होते.
सलग बाराव्या वर्षी होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेसाठी मैत्रेयी केसकर,समाधान भोरकडे , परशुराम कोरे,प्रशांत ठाकरे, शहाजी देशमुख, सुनील जगताप आदींनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

या स्पर्धेचे उद्घाटन पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर आणि द.ह कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्हीं.एम कुलकर्णी सर यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरण समारंभ पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नाना कवठेकर, आणि शांताराम कुलकर्णी सर यांच्या हस्ते संपन्न झाला.
उमेशचंद्र खेडकर वक्तृत्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशांत वांगीकर,गणेश धांडोरे , डॉ.प्रविदत्त वांगीकर,डॉ.गिरनार गवळी, डॉ.आकाश रेपाळ,डॉ.आनंद भिंगे ,सचिन लादे,राजेश शहा, प्रताप चव्हाण, सोमनाथ गायकवाड,दीपक इरकल, शशिकांत कराळे , शशिकांत घाडगे,राम मोरे,रवी ओहाळ , सचिन मेलगे,मंदार केसकर,अमित वाडेकर , संजीव मोरे , विनया उत्पात कुलकर्णी,पायल शहा,ईशान इरकल आदींनी परिश्रम घेतले.
