रोपळे येथील कॅनॉल ब्रिजवरील कॉंक्रीटीकरणाला शिवसेना युवासेना यांच्या पाठपुराव्याला यश
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर-कुर्डूवाडी रोड हा रस्ता अत्यंत वाहतूकीचा असून लांब पल्ल्याची वाहने या मार्गावर असतात.या रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉंक्रिटीकरण होऊनही बराच काळ लोटला मात्र अनेक छोट्या पुलावरील काम अपूर्ण अवस्थेत आहे.यामुळे याठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत.

याबाबत या रस्त्यावरुन वाहणाऱ्या अवजड वाहतूकदारांनी पंढरपूर शिवसेना-युवासेना यांच्याकडे तक्रार केली होती.त्या अनुषंगाने रोपळे कॅनॉल ब्रिजवरील काँक्रिटीकरणाची मागणी शिवसेना-युवासेना यांनी MSRDC विभाग पंढरपूर यांच्याकडे केली होती. त्याचा पाठपुरावा केला त्यास यश आले.

यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख नागनाथ रितूंड,समाधान इंद्रजीत गोरे युवासेना उपतालुका प्रमुख पंढरपूर तसेच शिवसेना शाखा आढीव चे पदाधिकारी शाखाध्यक्ष औदुंबर चव्हाण,शाखा उपाध्यक्ष गणेश जाधव,शाखा सचिव विलास कांबळे आदींसह शिवसेना-युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रोपळे कॅनॉल ब्रिजवरील काँक्रिटीकरणाच्या केलेल्या मागणीची दखल MSRDC विभागाने कामाला सुरुवात केल्या बद्दल पंढरपूर शिवसेना-युवासेना यांनी MSRDC विभागाचे आणि अधिकार्यांचे आभार मानले आहेत.
