
भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प २.० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई दि.२४- राज्यभरात सौर ऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम आपण तयार करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित ऊर्जेच्या माध्यमा तून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित…