
कोणावरही अन्याय होत असेल तर मी आमदार म्हणून नागरिकांच्या पाठीशी उभा राहीन – आमदार समाधान आवताडे
चुकीच्या पद्धतीने काम झाल्यास आमदार म्हणून नागरिकांच्याच बाजूने राहणार असल्याचाही दिला विश्वास.. पंढरपूरातील कॅरीडोर प्रकरणी नागरिकांमध्ये गैरसमज न पसरवण्याचे आवाहन आ.समाधान आवताडे यांनी केले.. पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०३/२०२५- पंढरपूर शहराच्या विकासासाठी सरकारने कॅरीडॉर राबविण्याचा विचार पक्का केला आहे.माञ यासाठी पंढरपूर येथील नागरिकांची मते जाणून घेणे हे माझे पहिले कर्तव्य आहे त्यासाठी आपण ही बैठक आयोजित केली…