चाहूल पावसाची

चाहूल पावसाची काळ्या ढगांनी व्यापले गगन,पहिल्या सरींनी धरतीचे मोकळे मन। डोंगर माथ्यावर पांघरले धुके,झाडांच्या पानांवर चमकती थेंब सुखे। धबधबे उंचावरून झेपावती जलधारा,गडगडाटी निनादांनी दरी-दरींमध्ये सारा। नदीच्या पात्रात पाणी नाचते थरथरून,लाटांमध्ये उमटते गाणी गूढ सांगून। हिरव्या गालीच्याने सजली धरती,मातीच्या सुवासाने भरली निसर्गाची कोंदणवाटी। शुद्ध वाऱ्याच्या स्पर्शाने हलते मन,पावसाळ्याच्या सुरुवातीला सापडते जीवन। ~ प्रीती प्रशांत माळवदेपंढरपूर

Read More
Back To Top