श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास चांदीची फुलदाणी अर्पण
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास चांदीची फुलदाणी अर्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.07:- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस शुभांगी संजय गुरव यांनी सुमारे 4 किलो वजनाच्या चांदीच्या दोन फुलदाणी अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल मंदिरे समितीच्यावतीने देणगीदार यांचा मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे यांनी श्री विठ्ठलाची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला….