कोजागरी पौर्णिमेला रात्री गुपचुप 21 वेळा या मंत्राचा जप करा, चंद्राप्रमाणे भाग्य उजळेल !


Sharad Purnima 2024: शरद पौर्णिमापासून शरद ऋतुची सुरुवात होते असे मानले जाते ज्याचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या धार्मिक ग्रंथांमध्ये असे वर्णन केले आहे की या शुभ दिवशी देवी लक्ष्मी आणि चंद्र देवाची उपासना करून प्रत्येक व्यक्तीला शुभ परिणाम मिळतो. या दिवशी रात्री चंद्रप्रकाशात चंद्रदेवाची पूजा केल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्य चांगले राहते.

 

वैदिक पंचांगानुसार यंदा कोजागरी पौर्णिमा सण 16 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाईल. या विशेष रात्री शांतपणे काही उपाय करून प्रत्येक व्यक्तीचे नशीब चमकू शकते. चला जाणून घेऊया शरद पौर्णिमेचे निश्चित उपाय.

 

शरद पौर्णिमा उपाय

शरद पौर्णिमेच्या दिवशी स्वतःच्या हाताने घरीच खीर किंवा आटीव दूध तयार करा. रात्री चांदीच्या भांड्यात काढून चांदण्यात ठेवा. शक्य असल्यास त्यात चांदीचे नाणे ठेवा. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर मनोभावे ती म्हणा. दूध रात्रभर चंद्रप्रकाशात राहू द्या. दुसऱ्या दिवशी देवी-देवतांची पूजा केल्यानंतर प्रसाद म्हणून ग्रहण करा. संपूर्ण रात्र ठेवणे शक्य नसल्यास चंद्राला नैवेद्य दाखवून तेथे बसून ‘ॐ चन्द्रमसे नमः’ या मंत्राचा 21 वेळा जप करा. नंतर प्रसाद ग्रहण करा. या उपायाने तुमच्या जीवनात सुख-शांती नांदेल. याशिवाय मनोकामना पूर्ण होण्यासोबतच आरोग्यही चांगले राहील.

 

सामान्य लोकांव्यतिरिक्त गर्भवती महिला देखील या पौर्णिमेला चंद्रप्रकाशात बसू शकतात. याने सुंदर बाळ जन्माला येते असे मानले जाते. तसेच च्रंद देवाची विशेष कृपा प्राप्त होऊन बाळ निरोगी राहतं.

 

अस्वीकरण: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top