Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा


sharad purnima 2024
शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमेला 5 विशेष उपाय केल्यास तुमचे नशीब सुधारेल. तर चला ज्योतिषीय उपाय काय आहेत ते जाणून घेऊया.

 

1. चंद्र दोष दूर होतात : शरद पौर्णिमेच्या दिवशी गच्चीवर किंवा गॅलरीत चंद्रप्रकाशात चांदीच्या भांड्यात दूध ठेवले जाते. मग ते दूध देवाला अर्पण केल्यावर प्यायले जाते. या दुधाचे सेवन केल्याने चंद्र दोष दूर होऊन रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते.

 

2. चंद्रदोष मुक्ती मिळवण्याचा उपाय : जर कुंडलीत चंद्र दोष असेल तर ते दूर करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. या दिवशी चंद्राशी संबंधित वस्तू दान कराव्यात किंवा सर्वांना दूधाचे वाटप करावे. याशिवाय 6 नारळ स्वतःहून ओवाळून वाहत्या नदीत वाहावेत.

 

3. लक्ष्मी प्राप्तीसाठी: शास्त्रात असे सांगितले आहे की प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे पिंपळाच्या झाडावर आगमन होते. त्यामुळे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून पिंपळाच्या झाडासमोर गोड पाणी अर्पण करावे.

 

4. वैवाहिक जीवनासाठी: असे म्हटले जाते की यशस्वी वैवाहिक जीवनासाठी, पती-पत्नी दोघांनी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दूध अर्पण केले पाहिजे. यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहतो.

 

5. सुख-समृद्धीसाठी: तुम्ही कोणत्याही विष्णु लक्ष्मी मंदिरात जाऊन अत्तर आणि सुवासिक उदबत्ती अर्पण करा आणि धन, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य यांची देवी लक्ष्मीला तुमच्या घरात कायमचा वास करावा यासाठी प्रार्थना करा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top